News Flash

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल करणार्‍या व्यक्तीला पुण्यातून अटक

मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई मेल गृह विभागाला पुण्यातील एका व्यक्तीने केल्याने एकच खळबळ उडाली.

मंत्रालय इमारत (संग्रहीत छायाचित्र)

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांना आला होता. त्यानंतर मंत्रालयाची कसून तपासणी केली असता, ती अफवा निघाल्याचे स्पष्ट झाले. त्या गोष्टीला काही दिवस होत नाही. तोवर मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई मेल गृह विभागाला पुण्यातील एका व्यक्तीने केल्याने एकच खळबळ उडाली.

शैलेंद्र शिंदे असे मेल करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल बी. टी. कवडे रोड परिसरात रहाणार्‍या शैलेंद्र शिंदे या व्यक्तिने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. शैलेंद्र याने मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले नसल्याने, असा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती मुंढवा पोलिसांनी सांगितली असून या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी, आरोपीला ताब्यात घेऊन गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 11:45 pm

Web Title: crime news blast man arrested planting bomb mantralaya svk 88 akp 94
Next Stories
1 पुणे ते पाकिस्तानची सीमा : आकर्षक व्याजदराचं आमिष; बापलेकांनी घातला साडेतीन कोटींचा गंडा
2 उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची मोठी कारवाई
3 पुणे : ‘रेकी’साठी सुरू केलं चायनीज रेस्तराँ; भिंत फोडून दीड किलो चांदीसह सोने केले लंपास
Just Now!
X