29 September 2020

News Flash

Video : पिंपरी-चिंचवडमध्ये गप्पा मारत थांबलेल्या दोघांवर टोळक्यांचा सशस्त्र हल्ला

पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी रात्री दोघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

 

पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी रात्री दोघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आठ-नऊ जणांच्या अज्ञात शसस्त्र टोळक्याने गप्पा मारत उभा असलेल्या मित्रांवर हॉकी स्टिक ने बेदम मारहाण करत कोयत्याने वार केले आहेत. यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून इंद्रजित आणि अजय अशी त्यांची नावे आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी अजय तुकाराम खानेकर या जखमी तरुणाने फिर्याद दिली असून अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी इंद्रजित माने, महेश शिवाजी कुंभारकर, किरण नवनाथ गोरे, कार्तिक माधव अटक आणि प्रथमेश येवले हे सर्व मित्र थेरगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला गप्पा मारत थांबले होते. हातात हॉकी स्टिक आणि कोयते घेऊन असलेल्या अनोळखी इसम हे तीन दुचाकीवरून आले. त्यांनी थेट सर्वांवर मारहाण करत वर करण्यास सुरुवात केली. सर्व मित्र सैरा वैरा धावत सुटले, मिळेल त्या दिशेने पळू लागले.

किराणा दुकाच्या इथे फिर्यादी अजय हा टोळक्याच्या तावडीत सापडला त्याला जीवे ठार मारण्याचा उद्देशाने डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. तेवढ्यात मित्र इंद्रजित याला टोळक्यातील एकाने मारत असताना त्याला वाचवण्याच्या उद्देशाने पुढे हात केला. यात अजय च्या हातावर गंभीर जखम झाली आहे. मारहाण झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. दरम्यान, काही कारण नसताना अचानक अज्ञात टोळक्याने मारहाण केल्याने सर्व मित्र भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. घटने चा तपास वाकड पोलीस करत असून अद्याप आरोपी फरार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 1:21 pm

Web Title: crime news in pipri chinchwad cctv video
Next Stories
1 पुण्यात उकाडा पुन्हा वाढणार
2 निवडणूक काळात सी-व्हिजिल अ‍ॅपवर बाराशे तक्रारी दाखल
3 प्रादेशिक बातम्यांच्या पहिल्या प्रसारणाचे हस्तलिखित आकाशवाणी पुणे केंद्राकडे सुपूर्द
Just Now!
X