News Flash

शहरात दहशत करणाऱ्या दोन गुंड टोळ्यांना मोक्का

दरम्यान, वारजे माळवाडी भागात दहशत करणाऱ्या गौरव पासलकर टोळीविरोधात मोक्का कारवाई  करण्यात आली.

शुभम कामठे, गौरव पासलकर टोळीवर कारवाई

पुणे : दहशत करणाऱ्या  हडपसरमधील गुंड शुभम कामठे टोळी, तसेच वारजेमधील गौरव पासलकर टोळीविरोधात महाराष्ट्र  संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

याप्रकरणी शुभम कैलास कामठे (रा. कोळपे वस्ती, लोणी काळभोर), दत्ता भीमराव भंडारी (वय २४), हृतिक विलास चौधरी (वय २१), सौरभ विठ्ठल घोलप (वय २२), साहिल फकिरा शेख (वय २१) यांच्यासह आणखी दोन साथीदारांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. फुरसुंगी परिसरात वैमनस्य तसेच वर्चस्वाच्या वादातून भंडारी आणि साथीदारांनी रोहन इंगळे,तसेच त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर टोळीप्रमुख शुभम कामठे पसार झाला होता.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी कामठे टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. सहायक आयुक्त कल्याणराव विधाते याप्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, वारजे माळवाडी भागात दहशत करणाऱ्या गौरव पासलकर टोळीविरोधात मोक्का कारवाई  करण्यात आली. याप्रकरणी गौरव सुरेश पासलकर, मंगेश विजय जडीतकर, पल्लू कमलेश चौधरी, राजू लक्ष्मण गेहलोत (सर्व रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांच्याविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपी पासलकर, जडीतकर, चौधरी, गेहलोत यांनी एका युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला लुटले होते. या टोळीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर  खटके यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.

शहरातील २३ गुंड टोळ्यांना मोक्का

शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळ्यांवर मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आतापर्यंत शहरातील २३ टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:01 am

Web Title: crime news pune city police crime akp 94
Next Stories
1 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ४ हजार ७७ नवीन करोनाबाधित, ३६ रूग्णांचा मृत्यू
2 पुणे – करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांकडून सुधारित आदेश जारी
3 पुण्यात राहून पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच; करोनामुळे शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू
Just Now!
X