News Flash

पुणे – प्रेमप्रकरणातून २० वर्षीय तरुणाचा खून; सहा जण ताब्यात

माझ्या मुली बरोबर प्रेम करायची लायकी आहे का असे म्हणून तरुणाचे अंगावर थुंकले

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडिल, चुलते, सख्या आणि चुलत भावांनी मिळून प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं असून यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विराज विलास जगताप (वय-२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जितेश वसंत जगताप वय-४४ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा च्या सुमारास आरोपींचा मोबाईल वरून फिर्यादी यांना फोन आला की, मयत विराज ला आम्ही पिंपळे सौदागर येथे मारले आहे. इथून घेऊन जा अस फोनद्वारे सांगितले. तेव्हा, फिर्यादी, मयत विराज ची आई आणि इतर काही जण घटनास्थळी पोहचले. विराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. फिर्यादी जितेश हे विराज च्या जवळ गेले. अगदी शेवटच्या घटका मोजत असलेल्या विराज ने सर्व हकीकत सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला की, मुलीचे वडील, भाऊ यांनी छोट्या हत्ती टेम्पो ने माझ्या भरधाव वेगातील दुचाकीला पाठीमागून धडक दिली. मी खाली पडलो, तेव्हा आरोपीच्या हातात दगड आणि लोखंडी रॉड होता. ते पाहून घाबरून जिवाच्या आकांताने पळू लागलो. मात्र, धाप लागल्याने खाली पडलो. तेव्हा, आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केली. माझ्या मुलीवर प्रेम करायची लायकी आहे का तुझी, मुलीवर प्रेम करतो का? असे म्हणून माझ्या अंगावर थुंकले, अस फिर्यादी यांना मयत विराज ने सांगितलं. हे सर्व फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, तत्काळ मयत विराज ला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु, सोमवारी दुपारी उपचारादरम्यान विराज चा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून, अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करत आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 10:32 am

Web Title: crime pune one person dead in impri chinchawad six arrest nck 90 kjp 91
Next Stories
1 टपाल वितरण यंत्रणा कोलमडली
2 पिंपरीत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, रस्ते गजबजले
3 अडचणीत सापडलेल्या तरुणाला वंदे मातरम् संघटनेकडून आधार
Just Now!
X