01 March 2021

News Flash

पुण्यात नागरिकांच्या मारहाणीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

ही तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न काही नागरिक आणि महिलांनी केला. मात्र अक्षयने महिलांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील वानवडी भागात गाड्याची तोडफोड आणि महिलांना धक्काबुक्की केल्याने नागरिकांनी केलेल्या मारहाणीत एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी वानवडी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षय सोनावणे (वय २८, रा. दरोडे वस्ती, वानवडी) असे मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अक्षय सोनावणे याने वानवडी भागात आल्यावर नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. ही तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न काही नागरिक आणि महिलांनी केला. मात्र अक्षयने महिलांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. यामुळे तेथील नागरिक संतप्त झाले. सर्व जण एकत्रित येत अक्षयला बेदम मारहाण केली. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला असून या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:35 pm

Web Title: criminal death in hitting of citizen in pune
Next Stories
1 पुणे शहरात जय जवान मित्र मंडळ;  पिंपरीत जय बजरंग तरुण मंडळ प्रथम
2 ‘एफटीआयआय’मध्येही ‘मीटू’
3 ‘बुक कॅफे’ना वाचकांची पसंती
Just Now!
X