28 February 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड : सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून कोयत्याने ४० ते ४५ वार करून खून

कसाबसा त्याने घरातून चिंचोळ्या गल्लीतून पळ काढला. मात्र...

(घटनास्थळावरील छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे पूर्ववैनस्यातून १९ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा तब्बल ४० ते ४५ वार करून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. अॅल्विन रवी राजगोपाळ (रा.जयभीम नगर, दापोडी) असं मयत गुन्हेगाराचे नाव आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक घरात घुसून अॅल्विनवर हल्ला करण्यात आला. यात तो जखमी झाला आणि कसाबसा त्याने घरातून चिंचोळ्या गल्लीतून पळ काढला. मात्र, हल्लेखोरांनी त्याला गल्लीत गाठत त्याच्यावर कोयत्याने ४० ते ४५ वार करून ठार केले. याप्रकरणी चार आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी क्लेरा राबर्ट कीटटो यांनी  फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण, रुपेश दिलीप संकपाळ, राहुल वीर उर्फ पप्या, निखिल, सनी गजभिव (सर्व राहणार दापोडी) अशी हल्ला करणाऱ्या  आरोपींची नावं असून यातील चार जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी की, मध्यरात्री दोनच्या सुमारास मयत अॅल्विनच्या घरात घुसून पाच जणांनी हल्ला चढवला, हल्ल्यात त्याची दोन बोटे कापली गेली.त्यानंतर जखमी झालेला अॅल्विन सैरावैरा चिंचोळ्या गल्लीत धावत होता. मात्र, हल्लेखोरांनी त्याला काही अंतरावर गाठले आणि कोयत्याने तब्बल ४० ते ४५ वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरानी सिमेंटचा गट्टू आणि दगडाचा देखील वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत फिर्यादी यांची आई पुष्पा राज गोपाळ या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दरम्यान खून केल्यानंतर आरोपीने पळ काढला मात्र काही तासातच भोसरी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून अद्याप एक आरोपी फरार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 11:20 am

Web Title: criminal murder in pimpri chinchwad
Next Stories
1 सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीतून आर्थिक, आरोग्य सक्षमीकरणाचा बंध
2 नवीन वर्षांत हेल्मेट सक्तीवर पोलीस आयुक्त ठाम
3 १ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी कोरेगाव भीमामध्ये कडेकोट बंदोबस्त
Just Now!
X