पुण्यातील नांदेड, शिवणे ग्रामपंचायत परिसरात मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी पात्रात उतरू नका. अशा स्वरुपाची सुचना नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून काढण्यात आली आहे. नदीपात्रत मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहराला वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चार ही धरणात पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्याने पुणेकर नागरिकाची काही प्रमाणात पाणी संकटातून मुक्तता झाली असताना. ही धरण 100 टक्के भरल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यंदा पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले गेले नसताना. धरण क्षेत्रापासून काही किलोमीटर अंतर असलेल्या नांदेड, शिवणे ग्रामपंचायत भागातून जाणार्‍या मुठा नदी पात्रात मगर आढळल्याची घटना घडली आहे.

यावर खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांनी पाण्यात उतरू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील धरण क्षेत्रात मगर आढळल्याची बाब समोर आली होती. आता यावर प्रशासन नेमकी काय उपाययोजना करते हे पाहावे लागणार आहे.