06 August 2020

News Flash

लॉकडाउनची घोषणा होताच पिठाच्या गिरणीत दळणासाठी गर्दी, दोन दिवसांचं वेटिंग

वीस वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्भवली

पिंपरी - लॉकडाउनच्या घोषणेमुळे शहरात दळण दळून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहेय

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउनची घोषणा झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील लोकांनी अन्नपदार्थांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. हा लॉक़डाउनचा कालावधी पुन्हा वाढू शकतो या भीतीने रोजच्या जेवणासाठी लागणारं पीठ दळून आणण्यासाठी नागरिकांनी पिठाच्या गिरण्यांमध्ये गर्दी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दळणं गिरणीत दळण्यासाठी आली आहेत की, त्यासाठी आता दोन दिवसांचं वेटिंग आहे. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली असल्याचे एका गिरणीचालकानं म्हटलं आहे.

लॉकडाउनची घोषणा होताच शहरातील नागरिक घाबरून गेले आहेत. अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरू केले आहे. दरम्यान, पिठाच्या गिरण्यांमध्ये कधीच गर्दी पाहायला मिळाली नव्हती. परंतु, लॉकडाउनची घोषणा होताच दळण दळण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र शहरात पहायला मिळाले. गिरण्यांमध्ये दळणाच्या पिशव्या ठेवायला जागा नसल्याने त्या दुकानाबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. हे दळण दळून मिळण्यासाठी दोन दिवसांचे वेटिंगही आहे. गेल्या २० वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहायला मिळाल्याचे गिरणी चालक शरद पाटोळे यांनी सांगितले.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून दहा दिवसांच्या लॉडाऊन घोषणा करण्यात आली आहे. परंतु, यातील केवळ पाचच दिवस कडक लॉडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर उर्वरित दिवसांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंसह धान्य दळण्याच्या पिठाच्या गिरणीत तोबा गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दोन दिवस दळण दळण्यासाठी ग्राहक वेटिंगवर आहेत. डब्बे, कापडी पिशव्या यामध्ये ग्राहकांनी धान्य दळण्यासाठी आणलेले आहे. येरव्ही दोन तासांत दळण दळून मिळायचे.

गिरणी चालक शरद पाटोळे म्हणाले, “लॉकडाउनमुळे लोकांनी दळण दळण्यासाठी गर्दी केली आहे. ग्राहक २० ते ३० किलो दळण आणत आहेत. अशी परिस्थिती या अगोदर कधीच नव्हती. पण, लॉकडाउनची घोषणा करताच नागरिक घाबरून गेले आहेत. आमच्यावरील ताण वाढला आहे. दिवसरात्र लोकांची दळणं दळावी लागत आहेत. आधी दोन तासात धान्य दळून देत असायचो आता दोन दिवस लागतील अशी परिस्थिती आहे. गिरणीमध्ये दळणं ठेवायला जागा उरलेली नाही. २० वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 3:19 pm

Web Title: crowd for grinding in the flour mill as soon as the lockdown was announced two days waiting aau 85 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुण्यातल्या लॉकडाउनवरुन गिरीश बापटांचा संताप, म्हणाले…
2 पुण्यात सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून खून
3 ठाणे, पुण्याला पुन्हा कुलूप
Just Now!
X