21 January 2019

News Flash

सलमान खानला पाहण्यासाठी तुफान गर्दी, सलमान अद्याप हजर नाही

ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी येणार आहे सलमान खान

पिंपरी येथे सलमान खानला पाहण्यासाठी गर्दी

हिंदू चित्रपटसृष्टीत अभिनेता सलमान खान याला पाहण्यासाठी पिंपरीत सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. पिंपरी येथील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स या भव्य शोरूमचे उद्घाटन आज सलमानच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी चार वाजल्यापासून लोकांनी सलमान खानला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. सलमानचा फॅन फॉलोइंग मोठा आहे. बंदोबस्तासाठी १०० ते १५० पोलीस कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत.

जुना मुंबई पुणे या महामार्गावर आंबेडकर चौक पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत,यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर ज्या ठिकाणी सलमान खान येणार आहे,त्या ठिकाणी नागरिक आणि चाहते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र गर्दी सांभाळताना पोलिसांची दमछाक होत आहे,अद्याप सलमान खान आलेला नाही.मूळ वेळ ही साडेपाच असताना तो रात्री नऊ नंतरच  येईल असे सांगण्यात आले आहे.मात्र चाहत्यांचा उत्साह कणभर ही कमी झाला नसून चाहत्यांची गर्दी वाढतच आहे.विशेष म्हणजे यामध्ये लहान मुले आणि तरुणीचा सहभाग आहे.

First Published on January 12, 2018 9:11 pm

Web Title: crowd of people to watch salman khan
टॅग Salman Khan