News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी झुंबड; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

लॉकडाउन काहीप्रमाणात शिथील करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी मानले प्रशासनाचे आभार

पिंपरी-चिंचवड शहरात पाच दिवसांपासून कडक लॉकडाउन सुरू आहे. मात्र, आजपासून नियमांमध्ये बदल करण्यात आला असून लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान, श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर ‘गटारी’ साजरी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी सकाळ पासूनच चिकन आणि मटणाच्या दुकानांसमोर रांगा लावल्याचे दिसून आले. यावेळी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. दोन ते तीन तास नागरिक रांगेत उभे आहेत. तर, स्थानिक प्रशासनाने लॉकडाउन शिथील करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर नागरिक खुश असल्याचेही पाहायला मिळाले असून अनेकांनी तर प्रशासनाचे आभारही मानले आहेत.

सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात दहा दिवसांचे लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. तर, आज (रविवार) पासून नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. उद्या पहिला श्रावण सोमवार असल्याने आज ‘गटारी’ साजरी करण्यासाठी चिकन, मटणाच्या प्रत्येक दुकानावर नागरिकांची अक्षरशा झुंबड उडाली होती. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा पूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून आले. सकाळ पासूनच मटण आणि चिकन खरेदी करण्यासाठी दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अक्षरशा दीड ते दोन तास रांगेमध्ये थांबून अनेकजण चिकन-मटण खरेदी करताना दिसून आले.

यावेळीर अनेकांनी स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी प्रशासनाचे आभारही मानले. एकीकडे दुकानदारांकडून नियमांचे पालन होत असल्याचा दावा केला जात असला, तरी सोशल डिस्टसिंगला मात्र हरताळ फसण्यात आल्याचे प्रत्यक्षात दिसत आहे. सकाळपासून साडे चारशे किलो मटण विक्री झाल्याचे एका मटण विक्रेत्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 12:55 pm

Web Title: crowd to buy mutton chicken in pimpri chinchwad msr 87 kjp 91
Next Stories
1 जुन्नर – राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू
2 देशभरात उद्यापासून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू
3 करोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची अडचण
Just Now!
X