News Flash

करोनाच्या संसर्गात पाडव्याच्या खरेदीसाठी झुंबड

दोन दिवसांच्या टाळेबंदीनंतर बाजारपेठेत गर्दी

दोन दिवसांच्या टाळेबंदीनंतर बाजारपेठेत गर्दी

पुणे : शहरात करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांच्या टाळेबंदीनंतर दुकाने उघडल्याने मंडई, तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. उपनगरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला बाजारात सोमवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी झाली होती.

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी चक्का, खवा, पूजा साहित्य, फुले तसेच गुढी उभी करण्यासाठी लागणाऱ्या काठी खरेदीसाठी सकाळपासून मंडई परिसरात गर्दी झाली होती. शहरात शनिवारी आणि रविवारी टाळेबंदी लागू होती. दोन दिवसांच्या टाळेबंदीला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेले दोन दिवस शहरात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी (१२ एप्रिल) मंडईतील भाजीपाला बाजार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यात आल्यानंतर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. सायंकाळी सहापर्यंत या भागात खरेदीसाठी गर्दी असल्याचे पाहायला मिळाले.

मार्केट यार्डातील घाऊक बाजार गेले दोन दिवस बंद होता. सोमवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी आवारात फक्त घाऊक खरेदीदारांना प्रवेश देण्यात आला. बाजार गेले दोन दिवस बंद असल्याने सोमवारी घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली. बाजारातील गर्दीचे नियमन करण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, गेले दोन दिवस शहरात वाहनांची वर्दळ नव्हती. तुरळक वाहनचालक टाळेबंदीत रस्त्यावर होते. सोमवारी सकाळनंतर शहरातील मध्यभागासह उपनगरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती.

मंदिरे बंद असल्याने फुलांना मागणी कमी

गुढीपाडव्याला फुलांना मोठी मागणी असते. मात्र, शहरातील मंदिरे बंद असल्याने फुलांना मागणी कमी असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. मंडई भागात किरकोळ फूल विक्रेत्यांकडे घरगुती ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. मार्केट यार्डातील फूल बाजारात झेंडूसह सर्व फुलांची आवक झाली. घाऊक बाजारात एक किलो झेंडूला वीस ते तीस रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला, असे अखिल फूल बाजार अडते संघटनेचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.

गेले दोन दिवस मार्केट यार्डातील घाऊक बाजार बंद होता. सोमवारी बाजाराचे कामकाज सुरू झाले. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी नेमण्यात आले होते.

– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:19 am

Web Title: crowds for gudi padwa shopping in the market in corona period in pune city zws 70
Next Stories
1 पाडव्याला आंबा महाग!
2 जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेमडेसिविरसाठी देण्यात आलेले पत्ते, क्रमांक संपर्क  क्षेत्राच्या बाहेर
3 सायकलपटू प्रियंकाच्या चाकांना प्रोत्साहनाची गती
Just Now!
X