News Flash

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती!

पर्यटनस्थळी बंदी असतानाही विकेंडला होत आहे गर्दी

लोणावळा : वीकएन्डला पर्यटकांची झालेली गर्दी.

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी असताना देखील नियमांची पायमल्ली करून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. यामुले करोनाचा प्रादुर्भाव वाढवण्याची भीती व्यक्त होत आहे. शनिवारी मास्क न घालणाऱ्या ५० जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली होती. आजही कारवाई सुरू असून गर्दी वाढल्याचं पोलिसांनी सांगितलं.

लोणावळा शहर परिसरातील पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करत आहेत. दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अनलॉक पाचमध्ये हॉटेल्स उघडण्याची मुभा देण्यात आल्याने पर्यटकांची ओढ लोणावळ्याच्या दिशेने असल्याचं दिसत असून काल शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

भुशी धरण, सहारा ब्रिज, लायन्स पॉईंट येथील रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. काही पर्यटकांनी निसर्गाच विलोभनीय रूप आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते. सहारा ब्रिजवर सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघनही होत होते.

वाढत्या गर्दीमुळे लोणावळा पोलीस देखील हतबल झाले असून पर्यटकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टसिंग आणि मास्क वापरावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 5:05 pm

Web Title: crowds of tourists in lonavala fear of increasing corona infection aau 85 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यू, १ हजार ५५ नवे करोनाबाधित
2 मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातारा येथे उदयनराजे स्वतः बैठक घेणार : विनायक मेटे
3 “उदयनराजे येतो म्हणाले होते, पण आलेच नाहीत”
Just Now!
X