News Flash

‘सीटीईटी’चा निकाल जाहीर

सीबीएसईने ७ जुलैला ही परीक्षा घेतली होती. एकूण २९ लाख २२ हजार २२७ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशभरातील ३ लाख ५१ हजार ८३० उमेदवार पात्र ठरले आहेत.

सीबीएसईने ७ जुलैला ही परीक्षा घेतली होती. एकूण २९ लाख २२ हजार २२७ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील २३ लाख ७७ हजार ३१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. प्राथमिक शाळांसाठी २ लाख १४ हजार ६५८ उमेदवार पात्र ठरले. तर माध्यमिक शाळांसाठी १ लाख ३७ हजार १७२ उमेदवार पात्र ठरले.

या परीक्षेचा निकाल   इच्छुकांना www.ctet.nic.in आणि www.cbse.nic.in या संकेतस्थळांवरही पाहता येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:51 am

Web Title: ctet results released abn 97
Next Stories
1 ‘पुणे-मुंबई हायपरलूप’ला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता
2 तुमच्या कामाशिवाय जनताही तुम्हाला निवडून देत नाही : आदित्य ठाकरे
3 पिंपरी-चिंचवडमध्ये शटर उचकटून २० मोबाईल लंपास
Just Now!
X