25 September 2020

News Flash

केंद्र सरकारकडून पुणे मेट्रोला किती निधी मिळणार याबाबत उत्सुकता

देशभरातील सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी एकूण १७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : केंद्राच्या अर्थसंकल्पात देशभरातील सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी १७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू असल्यामुळे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) मागणी केल्याप्रकरणी पुणे मेट्रो प्रकल्पाला किती निधी उपलब्ध होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, महामेट्रोने केंद्राकडे दोन हजार १० कोटींची मागणी केली होती. मेट्रो प्रकल्पाची प्रगतिपथावरील कामे पाहता त्यापेक्षा जास्त निधी मेट्रोला मिळेल, अशी आशा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मेट्रो मार्गिकांची कामे वेगात सुरू आहेत. दोन्ही मार्गावरील  खांब उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून दुमजली उड्डाण पूल, भुयारी मार्ग, डेपो उभारणीच्या कामाचा टप्पा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. याशिवाय स्वारगेट आणि शिवाजीनगर परिसरात बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (ट्रान्सपोर्ट हब) उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी महामेट्रोकडून केंद्र सरकारकडे २ हजार १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

केंद्र शासनाने शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना देशभरातील सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी एकूण १७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पुणे मेट्रोसाठी किती कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रगतिपथावरील कामे पाहता आणि नियोजित वेळेत मेट्रो मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्राकडून पुणे मेट्रोसाठी भरीव तरतूद करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 3:30 am

Web Title: curiosity about how much money central government to give for pune metro
Next Stories
1 शहरातील महागडय़ा मोटारींवर चोरटय़ांची नजर
2 अनधिकृत रिक्षा थांबे; वाहतुकीची अडवणूक
3 ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले
Just Now!
X