08 March 2021

News Flash

दाढी आणि कटिंगच्या दरात प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ

शहरातील केशकर्तनालयाच्या व्यावसायिकांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ केली असून यामुळे आता दाढी ४० रुपये व कटिंग ८० रुपये होणार आहे.

| January 7, 2015 03:05 am

शहरातील केशकर्तनालयाच्या व्यावसायिकांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ केली असून यामुळे आता दाढी ४० रुपये व कटिंग ८० रुपये होणार आहे. ही वाढ १ फेब्रुवारीपासून शहरात सर्वत्र लागू होणार आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण विशेष सभा शहर अध्यक्ष चंद्रशेखर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ही दरवाढ सर्वानुमते निश्चित करण्यात आली. या वेळी कृष्णकांत जगताप, नानासाहेब आढाव, विजय माने आदी पदाधिकारी व शहरातील नाव्ही व्यावसायिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. लाईट बिल, टॅक्स, दुकान भाडे आणि साहित्यात झालेली वाढ यामुळे ही दरवाढ करण्यात आली असल्याचे या वेळी जगताप यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 3:05 am

Web Title: cutting saloon shave rate hike
टॅग : Rate Hike
Next Stories
1 ज्येष्ठ गायक पं. पद्माकर कुलकर्णी यांचे निधन
2 ‘आयआरबी’च्या पुणे व मुंबईतील कार्यालयांवर ‘सीबीआय’चे छापे
3 शहरांत कार्यकर्त्यांची फलकबाजी सुरूच..
Just Now!
X