पुण्यातील भोसरी परिसरात रात्रभर गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रभर गॅस गळती झाली असल्याने सकाळी लायटरच्या सहाय्याने गॅस सुरु करत असताना हा स्फोट झाला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. माऊली साळुंखे, मनिषा साळुंखे आणि सिद्धार्थ साळुंखे असे जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे.

या गंभीर घटनेत मनिषा या ९० टक्के भाजल्या आहेत. तर माऊली साळुंखे ३० टक्के भाजले असून मुलगा सिद्धार्थ हा १२ टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेनंतर खासगी रुग्णालयात साळुंखे कुटुंबावर उपचार करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
two injured including a woman in fire incidents fire broke out at three places in pune city
मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे कुटुंब हे भोसरीमधील संत तुकाराम नगर येथे राहते. त्यांच्या घरात मुलगा, पती आणि त्या स्वतः राहतात. मंगळवारी रात्री स्वयंपाक केल्यानंतर त्यांच्याकडून गॅस सिलेंडर सुरू राहिले. त्यामधून रात्रभर गॅस गळती झाली. मनिषा या सकाळी उठल्यानंतर त्यांनी गॅस लाइटरच्या सहाय्याने सुरू केला तेव्हा गॅसचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. गृहिणींनी रात्रीच्या वेळी गॅस सिलेंडर बंद आहे का नाही याची शहानिशा करून झोपावे असे आवाहन यावेळी अग्निशमन दलाकडून करण्यात आलं आहे.