04 March 2021

News Flash

पुणे – घरात सिलेंडर स्फोट, आई वडिलांसह सहा महिन्याचं बाळ गंभीर जखमी

पुण्यातील खरडी भागातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे

पुण्यातील खरडी भागातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोट आई, वडिलांसहित सहा महिन्याचं बाळ गंभीर जखमी झालं आहे. शंकर भवाळे (२८), आशा शंकर भवाळे (२२) आणि त्यांचं सहा महिन्याचं बाळ या स्फोटात जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी संभाजीनगर येथे सर्व्हे नंबर १० मध्ये असणाऱ्या घरात शंकर भवाळे, आशा शंकर भवाळे आणि त्याच सहा महिन्याच बाळ राहत आहे. घरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. तिघे गंभीर जखमी झाले असून या तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 11:58 am

Web Title: cylinder blast in house in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 सुधारित नागरिकत्व कायदा डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या आधारावरच – चंद्रकांत पाटील
2 VIDEO : मी शिवथाळी खाल्ल्यास त्याचीही ब्रेकिंग न्यूज कराल – अजित पवार
3 अजित पवारांनी नाकारली शिवथाळी… दिलं योग्य कारण!
Just Now!
X