News Flash

डी. एस. कुलकर्णी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवले

ससून रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांअभावी न्यायालयाची परवानगी

डी. एस. कुलकर्णी (संग्रहित छायाचित्र)

गुंतवणुकदरांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक डी. एस. कुलकर्णी यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज पहाटे ते कोठडीत पडल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णलायात दाखल करण्याची परवानगी डीएसकेंच्या वकिलांनी न्यायलायाकडे मागितली. ही मागणी न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गुंतवणुकदरांच्या फसवणूकप्रकरणी डीएसकेंना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यँत पोलीस कोठडी सुनावली. त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर आज पहाटे डीएसके अचानक पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांनंतर तातडीने त्यांना ससून या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या सर्व तपासणी करण्यात आल्या. यामध्ये त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मात्र, ससून रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने डीएसकेंवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, अशी मागणी डीएसकेंच्या वकिलाने सुटीकालीन न्यायलायात करताच ती मंजूर करण्यात आली. त्यामुळे डीएसकेंना आता काही वेळात पुढील उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णलायात हालवणार येणार आहे.

दरम्यान, डीएसके आता काही काळ रुग्णालयात उपचार घेणार असल्याने त्यांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलीस त्यांची चौकशी करु शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 5:44 pm

Web Title: d s kulkarni will be shifted to dinanath mangeshkar hospital
Next Stories
1 एटीएममधील १ लाख ७६ हजारांच्या बॅटरी चोरांकडून लंपास
2 डी. एस. कुलकर्णी व्हेंटिलेटरवर, मात्र प्रकृती स्थिर
3 ब्रिटिश कॅम्पकडून कोकणातील रुग्णसेवेचा वसा
Just Now!
X