News Flash

गरीब मुलांना फक्त एक रुपयात शिक्षण!

या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे शिक्षण केवळ १ रुपयांमध्ये मिळेल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी दिली.

| July 7, 2015 03:07 am

अजिंक्य डी वाय पाटील समूहाच्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला महाराष्ट्र शासन कायद्यांतर्गत मान्यता प्राप्त झाली असून, या विद्यापीठातर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमानुसार हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे शिक्षण केवळ १ रुपयांमध्ये मिळेल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी दिली. ऑटोमोबाइल डिझाइन, इंटिग्रेटेड प्रॉडक्ट डिझाइन, फिल्म मेकिंग असे विविध अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे सुरू करण्यात येत आहे. www.adypu.edu.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती आणि अभ्यासक्रमांविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 3:07 am

Web Title: d y patil education student
Next Stories
1 शाळाबाह्य़ मुलांच्या पाहणीचा नुसताच गाजावाजा?
2 ‘एफटीआयआय’ खासगीकरणाचा सरकारचा डाव?
3 बत्तीस शिराळ्यातील नागपूजेच्या परंपरेसाठी कायद्यात बदल करणार
Just Now!
X