पुण्यातील भाजपचे आमदार आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या वानवडीतील परमारनगरमधील फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. दिलीप कांबळे यांच्या घरफोडी झालेल्या फ्लॅटमधून काहीही चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी येथे परमाननगर मधील एच बिल्डींगमध्ये पहिल्या मजल्यावर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा फ्लॅट आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी कटरच्या साहायाने दरवाजाचा कडी कोयंडा कट करून घरामध्ये प्रवेश केला.

घरामध्ये चोरटयाना काहीही सापडले नसल्याने त्यांनी बाजूच्या दोन फ्लॅटमध्ये देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली.