News Flash

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्यावतीने यंदा श्री गणेश सूर्यमंदिराचा देखावा

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. सोमवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प. पू. विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

तसेच, यावेळी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढली जाणार आहे. फुलांनी साकारलेले २१ नाग रथावर लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे.

देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बॅण्ड, प्रभात बॅण्ड, मयूर बॅण्ड आणि ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनीटांपर्यंत प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर हे ओदिशा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 6:28 pm

Web Title: dagaduseth halwai trust making this year shri ganesh surya mandirs appearance msr 87
Next Stories
1 पक्षातून कितीहीजण गेले, तरी आम्ही साहेबांसोबत : अजित पवार
2 बांधकाम क्षेत्रातील आव्हानांबाबत विचारमंथन
3 पाणीकराराचे गाडे अडले
Just Now!
X