News Flash

पुण्यात १६ जणांचा करोनामुळे मृत्यू, २८४ नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्णांनी गमावले प्राण

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात नव्याने २८४ रुग्ण आढळल्याने शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ लाख ६० हजार ९६१ एवढी झाली आहे. आज दिवसभरात १६ रुग्णांचा करोनानी लढताना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनाशी लढताना ४ हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३२२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा अखेर १ लाख ५१ हजार १४५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १७३ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात १२१ जणं करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८७ हजार ५९४ वर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ९४७ एवढी असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 10:17 pm

Web Title: daily update of covid 10 situation in pune and pimpri chinchwad city psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये करोना योद्धा डॉक्टररूपी देवीची साकारण्यात आली रांगोळी
2 पुण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
3 लग्नास नकार देणार्‍या तरुणीवर ॲसिड हल्ल्याची धमकी
Just Now!
X