23 November 2017

News Flash

पिंपरी-चिंचडवमध्ये विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने चोपले

तरुणाला तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले

Updated: September 12, 2017 8:09 PM

तळेगावमध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वीच दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड येथे मंगळवारी विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या एका तरुणाला महिला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. आज दुपारी तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयासमोर दुचाकीवर बसलेला एक तरुण विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. हा तरुण विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचे महिला पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर दामिनी पथकातील महिलांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. या महिला पोलिसांनी त्याला भर रस्त्यात त्याला चोपले. त्यानंतर तरुणाला तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महिला कॉन्स्टेबल प्रिया जाधव आणि कुंभार यांनी या तरुणाला अद्दल घडवली.

महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया जाधव यांनी यापूर्वी पिरंगुट येथे बंदोबस्तावर असताना पर्यटकांना त्रास देणाऱ्या मद्यधुंद प्रेमी युगुलांची धुलाई केली होती. तळेगावमध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वीच दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये प्रिया जाधव या दबंग महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

First Published on September 12, 2017 8:09 pm

Web Title: damini squad beten youth for girl harassment in pimpri chinchwad