09 July 2020

News Flash

दामिनी पथकाला चार वर्षे पूर्ण

महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची कामगिरी कौतुकास्पद

महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची कामगिरी कौतुकास्पद

पुणे : समाजातील गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाकडून करण्यात येत आहे. महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची कामगिरी कौतुकास्पद आहे, अशा शब्दात अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी बुधवारी या पथकाचे कौतुक केले.

महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या पोलिसांच्या दामिनी पथकाला चार वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे आदी या प्रसंगी उपस्थित होते. दामिनी पथकातील सात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

समाजात एखादी घटना घडली, की आपण फक्त त्या घटनेकडे त्रयस्थ म्हणून पाहतो. समाजाचा आपण भाग आहोत म्हणून घटनेकडे पाहत नाही. महिला पोलिसांचे काम अवघड असते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्या काम करतात. समाजातील गैरप्रकारांना आळा घालणे, महिलांची छेड काढणाऱ्यांवर कारवाई करणे अशी कामे दामिनी पथकाकडून कारवाई करण्यात येतात ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे मृणाल देव-कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ. वेंकटेशम म्हणाले, एखाद्या गुन्ह्य़ात महिला तक्रारदार असेल, तर तपासावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. अशा गुन्ह्य़ांच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. कागदपत्रे तसेच पुराव्यांचे योग्य पद्धतीने संकलन करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

दामिनी पथकाची कामगिरी

दामिनी पथकातील महिलांकडून शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालण्यात येते. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील सडक सख्याहरींवर कारवाई करण्यात येते. ज्येष्ठ महिला तसेच पुरुषांकडून तक्रारी आल्यास त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येते. एखाद्या भागात गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे काम या पथकाकडून केले जाते. चार वर्षांपूर्वी या पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 3:11 am

Web Title: damini squad completed four years zws 70
Next Stories
1 पावती नाही, तर पैसेही नाहीत!
2 सेवाध्यास : विस्मरणातून तरण्यासाठी..
3 नाटक बिटक : पत्रसंवादाची अभिवाचन मालिका
Just Now!
X