30 September 2020

News Flash

चार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर

| August 21, 2013 02:34 am

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड फाटा येथे रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.
 विठ्ठल कृष्णा माळी आणि नंदकुमार किसन राजपूत (रा. थेरगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर किसन चपटे (वय ४५) आणि गंगाराम साळुंखे (वय ५१, रा. पिंपळे गुरव) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड फाटा येथे हे चौघे जण तिकिटाची तपासणी करत होते. एका पीएमपी बसमधील तिकिटे तपासून रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये माळी आणि राजपूत यांचा मृत्यू झाला असून चपटे यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा देहूरोड पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2013 2:34 am

Web Title: dash by truck to four ticket checker in dehu road
Next Stories
1 दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाई रस्त्यावर (फोटो)
2 दाभोलकर हत्या : … या क्रमांकावर संशयितांबद्दल माहिती द्या
3 दाभोलकर हत्या: घटनास्थळावर काढलेले फोटो
Just Now!
X