News Flash

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांची सोमवारी निवड झाली.

| September 15, 2014 01:36 am

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांची सोमवारी निवड झाली. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत धनकवडे यांना ८३ तर युतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांना ४१ मते पडली. तर पुण्याच्या उपमहापौरपदी कॉंग्रेसचे नगरसवेक आबा बागूल यांची निवड झाली आहे, त्यांनी युतीचे भरत चौधरी यांचा पराभव केला.
पुण्याच्या महापौरपदावर गेली सलग १५ वर्षे आरक्षण होते. यंदा ते खुले झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल ११ नगरसेवक या पदासाठी इच्छुक होते. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी ५४, कॉंग्रेस २९, महाराष्ट्र नवनिर्माण सेना २८, भारतीय जनता पक्ष २६, शिवसेना १५ असे पक्षीय बलाबल आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:36 am

Web Title: datta dhankawade elected as new mayor of pune municipal corporation
टॅग : Ncp
Next Stories
1 आचारसंहिता लागताच शहरातील साडेतीन हजार फलक हटवले
2 अत्यल्प प्रतिसादामुळे पिंपरीत महिला काँग्रेसच्या मेळाव्याचा फज्जा
3 नगरसेवक बाबुराव चांदेरे व त्यांच्या मुलांवर मारहाणीचा गुन्हा
Just Now!
X