News Flash

लोणावळ्यात महाविद्यालयीन तरूण-तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

दोघेही सिंहगड महाविद्यालयात शिकत होते.

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

लोणावळ्यात सोमवारी आयएनएस शिवाजी  परिसरात तरूण आणि तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. दुपारी पाचच्या सुमारास याठिकाणी असलेल्या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळच मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतले.

पोलीस तपासादरम्यान या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून हे दोघेहीजण सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी तरूणाचे नाव सार्थक वाकचौरे असून तो बीए मॅकेनिकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. सार्थक हा मुळचा अहमदनगरच्या राहुरी येथील आहे. तर मृत तरूणीचे नाव श्रुती डुंबरे असून ती जुन्नरच्या ओतूर या गावात राहणारी आहे. हे दोघेही सिंहगड महाविद्यालयात शिकत होते. श्रुती ही हॉस्टेलवर राहत होती. तर सार्थक हा हॉस्टेलजवळच्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहत होता. दरम्यान, प्रथमदर्शनी या दोघांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दोघांची हत्या करण्यात आली किंवा या दोघांनी आत्महत्या केली, याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

दुपारी दोनच्या सुमारास तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी खात्री करण्यासाठी घटनास्थळी पाठवल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिसांना दोघांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आले. या दोघांचे तोंड, हात, पाय बांधून त्यांना मारहाण करुन त्यांचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2017 8:17 pm

Web Title: dead bodies of college boy and girl found in lonavla maharashtra
Next Stories
1 काम करताना सेल्फ मोटिवेशन महत्वाचे- तुकाराम मुंढे
2 पुण्यात गादीच्या कारखान्याला आग, एकाचा होरपळून मृत्यू
3 एकतर्फी प्रेमातून भाजप आमदाराच्या मुलीवर पिंपरीत प्राणघातक हल्ला, संशयित ताब्यात
Just Now!
X