पुणे जिल्ह्यातील म्हातोबाची आळंदी येथील रामोशीवाडीत एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. पाण्याच्या शोधात हा बिबट्या आला असावा असा अंदाज वन विभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथून काही अंतरावर असणार्‍या महातोबाची आळदी येथील रामोशीवाडी येथे आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका शेतकरी त्याची जनावरे शेतांमध्ये बांधत असताना त्याला एका जागेवर बिबट्या दिसला. त्या क्षणी त्या शेतकऱ्याने याची माहिती गावातील लोकांना देताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि जवळ जाऊन पाहिल्यावर बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले.घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले. हा बिबट्या पाण्याच्या शोधत हा भागात आला असावा. पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. अशी शक्यता वन विभाग आणि पोलिसानी व्यक्त केली.

illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका