News Flash

स्वाईन फ्लूचे शहरात ३३ बळी

१ जानेवारीपासून शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ३३ झाली आहे.

| August 12, 2013 02:45 am

शहरात स्वाईन फ्लूमुळे आणखी एकाचा बळी गेला आहे. यामुळे १ जानेवारीपासून शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ३३ झाली आहे. खेडमधील कोयाली येथे राहणाऱ्या अनिल मारुती आल्हाट (वय- ३३) यांचा शनिवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. ६ ऑगस्ट रोजी त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निदान ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’मार्फत (एनआयव्ही) करण्यात आले होते.
शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांपैकी ८ जण पुण्यातील होते. तर २५ जण बाहेरुन उपचारांसाठी आले होते. पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार १ जानेवारीपासून २२५ नागरिकांना स्वाईन फ्लू असल्याचे निदान करण्यात आले. यांतील १७४ रुग्ण उपचारांअंती बरे झाले आहेत. सध्या शहरांतील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूचे १८ रुग्ण उपचार घेत आहेत. यांतील १२ जणांना वॉर्डात दाखल करण्यात आले आहे, तर ६ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 2:45 am

Web Title: death of 33 persons from 1st jan by swine flu
टॅग : Swine Flu
Next Stories
1 शिल्पकार खेडकर यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाल्यास राज्याचा गौरव-शिवाजीराव अढळराव पाटील
2 मुद्रण हाच मानवी इतिहासातील महत्त्वाचा शोध – जावेद अख्तर
3 फलोत्पादक शेतकऱ्यांना महागडय़ा यंत्रांच्या खरेदीसाठी केंद्राची योजना – शरद पवार
Just Now!
X