News Flash

आकुर्डीत रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू

रूळ ओलांडताना एक्स्प्रेसखाली आल्याने हा अपघात झाला.

मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

पुण्यातील आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. रूळ ओलांडताना एक्स्प्रेसखाली आल्याने हा अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ विशाखापट्टणम एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एक ४० वर्षीय महिलेला रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक बसली. यात ही महिला जागीच ठार झाली. ही घटना सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. महिलेच्या अंगावर गुलाबी साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज, उंची पाच फूट, वर्ण सावळा असे वर्णन आहे. रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 5:30 pm

Web Title: death of a woman railway accident near akurdi railway station
Next Stories
1 पुण्यात पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानी चोरीचा प्रयत्न
2 चाकण येथे डोक्यात दगड घालून युवकाची हत्या
3 तरूणावरील हल्ल्याप्रकरणी सांगवी पोलिसांची तिघांना अटक