30 September 2020

News Flash

चोरीच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा मृत्यू

दुचाकीच्या बॅटरीची चोरी केल्याच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा अखेर उपचारादरम्यान ससून रूग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. कसबा पेठेत बुधवारी ही घटना घडली

दुचाकीच्या बॅटरीची चोरी केल्याच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा अखेर उपचारादरम्यान  ससून रूग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. कसबा पेठेत बुधवारी ही घटना घडली होती.
सावन धर्मा राठोड (वय १७ मूळ रा. सोलापूर) असे उपचारादरम्यान मृत्युमूखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.दरम्यान, त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी इब्राहिम मेहबूब शेख (वय ३५), इम्रान शेख (वय २८) आणि जुबेर तांबोळी (वय २६ तिघेही रा.कसबा पेठ) यांना गुरूवारी ( १४ जानेवारी) यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली होती. राठोड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (१३ जानेवारी) राठोड हा कसबा पेठतील पवळे चौक परिसरातून निघाला होता. त्यावेळी तिघा आरोपींनी त्याला अडविले. दुचाकीच्या बॅटऱ्यांची चोरी का केली, अशी विचारणा करून आरोपींनी त्याला मारहाण केली.त्यानंतर त्याला काही अंतरावर असलेल्या एका छोटय़ा गल्लीत नेले. त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यानंतर गंभीर भाजलेल्या राठोड याला टेम्पोत बसविले. डेंगळे पूलानजीक त्याला सोडून आरोपी पसार झाले. भाजलेल्या अवस्थेत तो कसबा पेठ पोलीस चौकीत गेला आणि याघटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. राठोड याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो ६५ टक्के भाजला होता. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 2:55 am

Web Title: death of boy due to fire in petrol
टॅग Boy,Criminal,Death
Next Stories
1 बंदिजनांचे आयुष्य बदलण्यासाठी ‘प्रेरणापथ’
2 सव्वाचार लाखांहून अधिक पुणेकर वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’
3 प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलीचा खून, प्रियकर गजाआड
Just Now!
X