21 October 2020

News Flash

पाण्याच्या टाकीत पडल्याने भोसरीतील वृद्धेचा मृत्यू

तोल जाऊन पडल्या टाकीत

पुण्याच्या भोसरी भागात इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याने एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. चंद्रप्रभा अंबादास आंबडेकर (वय ६५) अस मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आंबडेकर भोसरीतील पोटे वसाहत याठिकाणी राहत होत्या. राहत्या इमारतीत त्या दररोज सकाळी आणि संध्याकाळी जिन्याच्या खालील टाकीचा कॉक बंद करण्याचे काम करायच्या. त्याचप्रमाणे त्या बुधवारी सकाळी कॉक बंद करण्यासाठी गेल्या. यावेळी तोल जाऊन त्या टाकीत पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.

घरातील व्यक्तींना चंद्रप्रभा बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने संशय आला. त्यांना शोधण्यासाठी बाहेर आले असता चंद्रभागा यांची चप्पल त्याच ठिकाणी पडली होती. तसेच टाकीचे झाकण उघडे असल्याने घरच्यांना संशय आला आणि चंद्रप्रभा यांचा टाकीत पडून मृत्यू झाल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे टाकीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना कायम घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 6:00 pm

Web Title: death of old women as she fall in water tank of society in bhosri pune
Next Stories
1 ‘मेक इन महाराष्ट्र’चा लाभ घेतलेल्या तरुणांची आकडेवारी खोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर आरोप
2 डीएसकेंच्या पुण्यातील बंगल्याचा ८ मार्चला लिलाव
3 पोलिसांकडून मोठा बंदोबस्त
Just Now!
X