पुण्यात आज झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. याच दरम्यान दत्तवाडी येथे एका भिंतीच्या बाजूला कचरा वेचक महिला कचर्‍याचे वर्गीकरण करत बसली असताना. जोरदार पावसाने भिंत खचुन अंगावर पडल्याने या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत. संगीता रणदिवे (वय 35 रा. जनता वसाहत व्यवसाय भंगार दुकान) असे मृत महिलेचे नाव आहे.

दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास गेवारे यांनी घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आज सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास दत्तवाडी येथील निर्मल मित्र मंडळ येथील एका मैदानाच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या आडोशाला संगीता विजय रणदिवे ही महिला कचर्‍याचे वर्गीकरण करत बसलेली होती. याच दरम्यान जोरदार पावसामुळे भिंत खचली आणि त्यांच्या अंगावर पडल्याने ही महिला ढिगाऱ्या खाली दबल्या गेली. या घटनेबाबत आजुबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी ढिगाऱ्या खालून या महिलेस बाहेर काढले. यानंतर तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.