रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा या त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून डेक्कन क्वीन आणि पंजाब मेल या दोन्ही एक्स्प्रेसचा वाढदिवस साजरा करत आहेत. १ जून रोजी डेक्कन क्वीनचा ८९ वा वाढदिवस तर पंजाब मेलचा १०७ वा वाढदिवस दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे रेल्वे स्टेशनवरच हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दोन्ही गाड्यांचे चाहते, प्रवासी या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित होते.
हर्षा शहा या कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा होत्या. या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. या सोहळ्याला हर्षा शहा, आयुक्त जिकलिंगम, डीआरएम मिलिंद देऊसकर, सिनिअर डिसीएसम कृष्णनाथ पाटील, डीसीएम दास, संजय कुमार, स्टेशन प्रबंधक ए. के. पाठक, दिलीप होळकर, संदीप चव्हाण तसेच अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी या सगळ्यांनी या सोहळ्यात आपली हजेरी नोंदवली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2018 9:30 pm