News Flash

पुण्यात टाळेबंदीची आवश्यकता नाही

शहरात कडक टाळेबंदी करण्याबाबतची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना के ली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय

पुणे : मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली पुण्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ही जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात नाही. नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यात कडक टाळेबंदीची आवश्यकता नाही, अशी भूमिकाही मोहोळ यांनी मांडली.

शहरात कडक टाळेबंदी करण्याबाबतची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना के ली आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याबाबतची भूमिका शुक्रवारी मांडली.

महापौर मुरलीधर मोहोळ  म्हणाले,की करोनाबाधित रुग्णांची जी आकडेवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे, ती सध्याची असूच शकत नाही. शहरातील करोना संसर्गाची परिस्थिती बदललेली आहे.  त्यांच्याकडे जी आकडेवारी जाहीर के ली जात आहे त्यामध्ये विसंगती आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील परिस्थिती बदलली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजाराने कमी झाली आहे. मृत्युदरही तुलनेने खाली आला आहे. त्याचबरोबर महापालिके च्या माध्यमातून शहरात सात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मोहोळ म्हणाले,की शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना के ल्या जात आहेत. पुण्यात १ लाख आणि मुंबईत ५३ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या असल्याचे पुढे आले आहे. मात्र ही आकडेवारी के वळ शहराची नसून पुणे, पिंपरी-चिंचवड, कॅ न्टोन्मेंट आणि उर्वरित जिल्ह्य़ाची असावी, असे वाटते. शहरात ३९ हजार सक्रिय रुग्ण आहेत. हीच संख्या पंधरा दिवसांपूर्वी ५५ हजार एवढी होती. कडक र्निबध आणि प्रतिबंधात्कम उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे ही सर्व माहिती प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून न्यायालयात सादर के ली जाईल. टाळेबंदी होणार असल्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे न्यायालयात महापालिके च्या वतीने बाजू मांडली जाईल. शहरात के वळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळे टाळेबंदीची आवश्यकता नाही.

दोन आठवडय़ात चित्र बदलले

शहरात १८ एप्रिल रोजी सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ हजार ३६ एवढी होती. ६ मे पर्यंत ती ३९ हजार ५८२ पर्यंत खाली आली आहे. सक्रिय करोनाबाधित रुग्णसंख्या १६ हजार ४५४ ने घटली आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती बदलत असून पुढील दोन आठवडय़ात शहरातील चित्र बदललेले असेल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 2:18 am

Web Title: decision affidavit mumbai high court pune lockdown ssh 93
Next Stories
1 मुलांना संसर्ग झाल्यास स्वतंत्र रुग्णालय
2 मराठा आरक्षणाच्या ठरावासाठी विशेष अधिवेशन
3 “गाडी विकून आईला पैसे द्या”.. असा व्हाईस मेसेज पाठवून तरुणाची खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या
Just Now!
X