विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा निर्णय

पुणे : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत तृतीय किं वा अंतिम वर्षात तात्पुरता प्रवेश (प्रोव्हिजनल अ‍ॅडमिशन) घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या बाबतचा निर्णय घेतला असून, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

विद्यापीठाच्या नियमानुसार पहिल्या वर्षातील सर्व विषयांत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच तृतीय वर्षात प्रवेश मिळतो. मात्र करोनाच्या परिस्थितीमुळे शासनाच्या परिपत्रकानुसार प्रथम वर्षाचे विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही तृतीय किं वा अंतिम वर्षात तात्पुरते प्रवेश देण्यात आले. पहिल्या वर्षातील विषय राहिलेल्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांनी त्यांचे विषय डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेत किं वा एप्रिलपासून झालेल्या परीक्षेत सोडवून पात्रता पूर्ण के ली असल्यास त्यांना त्यांच्या तिसऱ्या किं वा अंतिम वर्षाची परीक्षा देता येईल. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्याची मागणी युवक क्रांती दलाकडून विद्यापीठाकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यात आला.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, की प्रथम वर्षातील राहिलेल्या विषयांसाठी घेतलेल्या परीक्षेत किं वा प्रथम सत्राच्या परीक्षेत हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र प्रवेश अर्ज भरून होईपर्यंत त्यांचा पहिल्या वर्षातील राहिलेल्या विषयांचा निकाल जाहीर झालेला नसल्याने ते तृतीय किं वा अंतिम वर्षाच्या पहिल्या सत्राचा परीक्षा अर्ज भरू शकले नाहीत. आता संबंधित विद्यार्थी पात्र ठरले असल्याने आणि त्यांनी तात्पुरता प्रवेश घेतलेला असल्याने त्यांची परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

अंतिम वर्षाची परीक्षा

पहिल्या वर्षातील विषय राहिलेल्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांनी त्यांचे विषय डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेत किं वा एप्रिलपासून झालेल्या परीक्षेत सोडवून पात्रता पूर्ण के ली असल्यास त्यांना त्यांच्या तिसऱ्या किं वा अंतिम वर्षाची परीक्षा देता येईल. या बाबत निर्णय घेण्याची मागणी युवक क्रांती दलाकडून विद्यापीठाकडे करण्यात आली होती.