News Flash

आठ-दहा दिवसानंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीबाबत निर्णय!

अजित पवार यांचे स्पष्टीकरण

संग्रहित

दिवाळीच्या कालावधीत रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली. आता करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. रुग्णसंख्याही वाढत असल्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये परिस्थिती पाहून टाळेबंदीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमदेवार जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मेळावा झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले,की दिवाळीच्या कालावधीत रस्त्यावर बरीच गर्दी दिसून आली. गर्दी एवढी वाढली की करोना गर्दीत चेंगरून मेला की काय, असे वाटण्याची परिस्थिती होती.

एकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही, हे मनातून काढून टाकले पाहिजे. त्यामुळे नियमांचे पालन करून वैयक्तिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांशी चर्चा करण्यात येत

आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसांत परिस्थितीचा विचार करून टाळेबंदीचा योग्य तो निर्णय घेतला जाईल. टाळेबंदीचा निर्णय आत्ताच घेतला तर नागरिकांमध्ये घबराट पसरेल.

मुखपट्टी टाळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर दिल्लीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. दिवाळीनिमित्ताने आपल्याकडे कारवाई वेगात झाली नाही, मात्र आता कारवाई तीव्र केली जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:18 am

Web Title: decision on lockout after eight to ten days abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 थंडीची प्रतीक्षाच..
2 आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया परवानगी
3 करोनाच्या संकटातही लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी
Just Now!
X