जिल्ह्य़ातील मृत्युसंख्येचे विश्लेषण

पुणे : करोना रुग्णसंख्येतील वाढ रोखणे हे आव्हान यंत्रणांसमोर असतानाच नव्या रुग्णांना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे ठरणार आहे. कारण रुग्णालयात पोहोचण्यात होणारा विलंब हे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील पहिल्या २४५ मृतांचे विश्लेषण जिल्हा परिषदेच्या यंत्रणांकडून करण्यात आले, त्यातून ही माहिती समोर आली आहे.

बहुतांश रुग्ण हे लक्षणे आढळल्याच्या चौथ्या दिवशी उपचारांसाठी दाखल झाल्यामुळे उपचारांसाठी लागणारा महत्त्वाचा वेळ हातून निघून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. हवेली, शिरुर, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचेही या विश्लेषणातून दिसून आले आहे. ३ सप्टेंबरला जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात सर्वाधिक २४ रुग्ण दगावले. जिल्ह्य़ाच्या इतर तालुक्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण चार टक्के  किं वा त्याहून कमी आहे.

करोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्यावर पहिल्या दिवशी ७३, म्हणजे २९.८ टक्के  रुग्णांनी उपचार सुरू के ले. दोन ते चार दिवसांमध्ये उपचार सुरू करणाऱ्या रुग्णांची संख्या ११५ म्हणजेच ४६.९३ टक्के  एवढी आहे. १४.२८ टक्के  रुग्णांनी लक्षणे दिसल्याच्या पाचव्या ते सहाव्या दिवशी उपचार सुरू के ले. सातव्या दिवशी उपचारांना सुरुवात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे. उपचारांसाठी जाण्यास विलंब के लेले तब्बल १४ रुग्ण दाखल होताच २४ तासात मरण पावले आहेत. लक्षणे दिसताच एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण १०.२० टक्के  आहे. रुग्णालयात आल्यावर दोन ते चार दिवसात ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३०.५९ टक्के  एवढे आहे. पाच ते सहा दिवसात उपचार सुरू करणारे ३० रुग्ण दगावले असून हे प्रमाण ११.७६ टक्के  एवढे आहे. सात दिवसांनी उपचार सुरू के ल्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक ३८.१ टक्के  एवढे आहे.

तालुका         एकूण          मृत्यूचे

                    मृत्यू         प्रमाण

आंबेगाव       २८           ११.४२

बारामती        ८            ३.२६

भोर            ८             ३.२७

दौंड            १४             ५.७१

हवेली          ५६             २२.८६

इंदापूर          ११            ४.४८

जुन्नर          २३           ९.३८

खेड            २५             १०.२

मावळ           १४             ५.७१

मुळशी           १३            ५.३०

पुरंदर             ७              २.८५

शिरुर            ३४             १३.८८

वेल्हा             ४               १.६३

एकूण            २४५           १०० टक्के