News Flash

नाटकांसाठी तिमाही वाटप करा

कडक निर्बंध लागू झाल्यानंतर १ एप्रिलपासून शहरातील नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली आहेत

मराठी नाट्यव्यवस्थापक संघाची मागणी

पुणे : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशातून शहरातील नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमी  वर नाटकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महापालिकेतर्फे केले जाणारे चौमाही तारखांचे वाटप यंदा तिमाही करावे, अशी मागणी मराठी नाट्यव्यवस्थापक संघाने केली आहे.

महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाटकाचे प्रयोग करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे नाट्यसंस्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना चार महिन्यांच्या तारखांचे वाटप केले जाते. या वर्षी एप्रिलपर्यंतच्या तारखांचे वाटप झाले होते. करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर ५ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत नाटकांचे प्रयोग सुरू करण्याची परवानगी दिली होती. ५० टक्के आसन क्षमतेमध्ये नाटकाचे प्रयोग सुरू असताना करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून १ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार नाटकाच्या तारखांचे वाटप रद्द करण्यात आले. सध्या १५ मेपर्यंत कडक निर्बंध असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा तारखांचे चौमाही वाटप करण्याऐवजी हे वाटप तीन महिन्यांसाठी करावे, अशी मागणी पुण्यातील नाट्यव्यवस्थापकांनी महापालिकेकडे केली आहे. मोहन कुलकर्णी, प्रवीण बर्वे, शिरीष कुलकर्णी आणि समीर हंपी यांनी यासंदर्भात महापालिका सांस्कृतिक केंद्रप्रमुख सुनील मते यांना निवेदन दिले आहे.

मोहन कुलकर्णी म्हणाले, कडक निर्बंध १५ मेपर्यंत असले तरी सध्याची परिस्थिती ध्यानात घेता त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या चौमाही तारखांच्या वाटपातील एप्रिल महिना नाट्यगृहे बंद असल्यामुळे वाया गेला. आतादेखील १५ मेनंतर नाटकांना परवानगी दिली आहे.

कडक निर्बंध लागू झाल्यानंतर १ एप्रिलपासून शहरातील नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. १ मेपासून निर्बंधांमध्ये आणखी १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमी  वर नाट्य व्यवस्थापकांनी तीन महिन्यांसाठी तारखांचे वाटप करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. – सुनील मते, महापालिका सांस्कृतिक केंद्रप्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:02 am

Web Title: demand for marathi drama manager association akp 94
Next Stories
1 एप्रिलचा उन्हाळा पुणेकरांसाठी सुसह्य
2 रेमडेसिविर पुरवणाऱ्या कंपनीवरील बंदी उठवली
3 नागरिकांना धान्य मिळण्यात अडचणी
Just Now!
X