19 January 2021

News Flash

गौरी आगमनानिमित्त शोभिवंत फुलांना मागणी

फूल बाजारात बहर; फुलांचे दर तेजीत

फूल बाजारात बहर; फुलांचे दर तेजीत

पुणे : गौरीचे आगमन मंगळवारी (२५ ऑगस्ट) होणार असून सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या मागणीत वाढ झाली. गणेशोत्सवात फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने दर तेजीत आहेत.

सजावटीसाटी जरबेरा, डच गुलाब, कार्नेशियन, ऑर्केड, ग्लेडिओ या फुलांचा वापर केला जातो. पुणे जिल्ह्य़ातील मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी हरितगृहात मोठय़ा प्रमाणावर शोभेच्या फुलांची लागवड करतात. मार्केटयार्डातील फूल बाजारात मावळ तालुक्यातून फुलांची आवक होत आहे. त्याबरोबरच शेवंती, गुलछडी, झेंडू या फुलांना मागणी वाढली आहे. फूल बाजारात शहर आणि उपनगर परिसरातील खरेदीदार तसेच घरगुती ग्राहकांनी सोमवारी सकाळी गर्दी केली होती. फुलांना मागणी वाढल्याने दर तेजीत आहेत, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

पुणे, बीड, सातारा, सोलापूर तसेच कर्नाटकातील हावेरी, चिकबलापूर, चित्रदुर्ग येथून झेंडूची आवक झाली. झेंडूची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी झेंडूचा प्रतिकिलोचा दर प्रतवारीनुसार २०० ते ३०० रुपये होता. पुणे जिल्ह्य़ात झेंडूला चांगले दर मिळत असल्याने तेथील शेतक ऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर बाजारात झेंडू विक्रीस पाठविला. त्यामुळे दर कमी झाले, असे भोसले यांनी सांगितले.गेले दोन दिवस झेंडूला उच्चांकी दर मिळत होते. कर्नाटकातील फूल उत्पादक शेतकरी पुण्यातील फूलबाजारात कागडा फुले नियमित विक्रीस पाठवितात.

करोनाचा संसर्ग असताना  खरेदीसाठी गर्दी

करोनाचा संसर्ग असताना गौरीच्या खरेदीसाठी महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक परिसरात गर्दी झाली. या भागातील हार फुल विक्रेत्यांकडे सकाळपासून गर्दी झाली होती.

* फुलांचे (एक किलो) दर पुढीलप्रमाणे- झेंडू ५० ते २०० रुपये किलो, गुलछडी- ४०० ते ५०० रुपये, शेवंती- १५० ते २५० रुपये, जरबेरा-  २० ते ४० रुपये, कार्नेशियन- ५० ते १६० रुपये, ऑर्केड- २०० ते ३०० रुपये, गॅल्डिओ- ५० ते १०० रुपये, डच गुलाब गड्डी- ८० ते १५० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 1:15 am

Web Title: demand for ornamental flowers on the occasion of gauri arrival zws 70
Next Stories
1 आरटीई प्रवेशांसाठी ३१ ऑगस्टची मुदत
2 शिक्षक भरतीसाठीचे प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदत
3 कोकणासह विदर्भात पावसाची शक्यता
Just Now!
X