News Flash

भाजपच्या ‘या’ सेलिब्रेशनची कीव येते : अजित पवार

श्रीमंत लोकांनी काळा पैसा पांढरा केला

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज पुण्यात महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयाचे भाजप सेलिब्रेशन करत असताना विरोधीपक्ष नोटाबंदीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. भाजप नोटाबंदीच्या निर्णयाचे सेलिब्रेशन करते याची कीव येते, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. नोटाबंदीच्या निर्णायाला एक वर्ष उलटले. मात्र, सरकारने अद्यापही काळा पैसा किती बाहेर आला, हे सांगितले नाही. नोटाबंदीचा दिवस आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज पुण्यात महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पुणे शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काळापैसा बाहेर येईल, असा दावा केला होता. मात्र, त्याची आकडेवारी अद्याप ही सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेली नाही. हा निर्णय नक्की कोणासाठी घेतला होता? असा प्रश्न उपस्थित करत श्रीमंत लोकांनी काळा पैसा पांढरा केला असून कॅशलेस व्यवहार झालाच नाही, असे ते म्हणाले. मोदींनी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली. यातून भ्रष्टाचार वाढला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यापुढील काळात देखील सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात लढा सुरुच राहिल, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 1:16 pm

Web Title: demonetisation anniversary ncp celebrated black day ajit pawar target narendra modi in pune
Next Stories
1 तेलगीची ‘मालमत्ता’ धूळ खात!
2 भाजपच्या माजी शहराध्यक्षाचा पत्ता स्वकीयांनीच कापला
3 नालासोपाऱ्यातील सेना नगरसेवकाच्या एक कोटी रुपयांवर टाच
Just Now!
X