News Flash

निधी कमी पडू देणार नाही, करोना नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा -अजित पवार

पुण्यातील पहिल्या रुग्णांची केली चौकशी

उपमुख्यमंत्री अजित पवार.

पुण्यात करोनानं थैमान घातलं आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यातील स्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेच्या वतीनं करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून महापालिकेनं वॉर रूम प्रणाली कार्यपद्धत सुरू केली आहे. याची पाहणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने डॅश बोर्ड (वॉर रूम) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली असून, करोनबाधित रुग्ण, शहरातील करोनाबाधित क्षेत्र, वाढत असलेला परिसर याबाबतची अद्यावत माहिती याठिकाणी संकलित केली जात आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यास प्रशासनाला सोपं जातं आहे. या प्रणालीविषयी मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. “ही प्रणाली उत्तम आहे. एखाद्या करोनाबाधित नागरिकांचा फोन आला, तर तत्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे. भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे अन्य ठिकाणी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे,” असं ते म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी पुण्यात सापडलेल्या पहिल्या रुग्णांच्या सध्याच्या स्थितीविषयी चौकशी केली. “आपण त्यांच्या सतत संपर्कात असतो. रोज चार ते साडेचार हजार लोकांना फोन केला जातो,”असं आयुक्तांनी सांगितलं.

“डॉक्टर, रुग्णवाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी करावी, लगेच उपलब्ध करून देता येईल,” असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 8:51 pm

Web Title: deputy chief minister ajit pawar direct to pune corporation commissioner bmh 90
Next Stories
1 चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात सर्वाधिक २९१ रुग्ण आढळले; १४ जणांचा मृत्यू
2 पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमधून बाहेर; दुकानं खुली झाल्याने मार्केटमध्ये मोठी गर्दी
3 GoodNews : पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी
Just Now!
X