मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आजी-माजी आणि भावी सहकाऱ्यांबद्दल केललं एक विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानानंतर आता भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपाकडून देखील प्रतिक्रिया आली आहेकेलेल्या एका विधावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं असून, नेते मंडळींकडून विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. शिवाय, भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार का? यावर देखील सर्वसमान्यांपासून ते राजकाराण्यांपर्यंत चर्चा सुरू आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!

“मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. आम्ही सर्व महाविकास आघाडीचं काम एकत्र करत असताना आजपर्यंत तरी व्यवस्थित चाललेलं आहे. तरी त्या वक्तव्याला मी फार काही महत्व देत नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी काय बोलव, काय बोलू नये त्यांचा प्रश्न आहे.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत?-

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. यावेळी, व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. एवढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागे बघून ‘भावी सहकारी’ म्हणून संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.