News Flash

आपण पुणेकर आहोत; ‘नाईट लाईफ’वर अजित पवारांचं खास पुणेरी उत्तर

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव आला, तर विचार करू असं म्हटलं होतं

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील काही ठिकाणी २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून प्रस्ताव आला, त्यावर विचार करू, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेरी शैलीत उत्तर दिलं. “मुंबईच जीवन वेगळं असून २४ तास मुंबई जागी असते. त्यातून काय अनुभव येतो, ते पाहू. आपण पुणेकर आहोत. पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेण्याचा विचार करू,” असं अजित पवार म्हणाले.

पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार उरो रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवार यांना पुण्यातील नाईट लाईफ सुरू करण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर अजित पवार म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याचा प्रस्ताव आला, तर विचार करू ही आदित्य ठाकरे यांची बातमी मी वाचली. मुंबईचं लाईफ वेगळं आहे. मुंबई कधी झोपत नाही असं नेहमी बोललं जातं. ती २४ तास जागी असते. हे आपण अनेकदा ऐकलं आहे. त्यामुळे मुंबईबद्दल तसा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचा अनुभव काय येतो, हे पाहुया. त्या अनुभवातून जर काही निष्पन्न झाले, तर पुढचा विचार करू. लगेच इकडं सुरू झालं की इकडे सुरू करा, असं नसतं. आपण पुणेकर आहोत, पुणेकरांचे वेगळं मत असू शकत. इथल्या एनजीओचं वेगळं मत असू शकतं. त्याच्यामुळे पुणेकरांना मान्य होईल, अशा प्रकारचा तिथला अनुभव घेतल्यानंतर या गोष्टीचा विचार करू, असं सांगतानाच “मी सुरू करणार असंही म्हटलं नाही आणि नाही देखील म्हटलो नाही,” असं म्हणत अजित पवारांनी स्वतःची बाजू सुरक्षित केली.

साई जन्मस्थान वाद –

“मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे. पाथरी आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना आवाहन केलं आहे. चर्चेतून मार्ग काढू. कोणाच्याही भावना दुखवण्याचं कारण नाही. कधी कधी असा वाद पुढे येतो. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. मी सुद्धा साई भक्तांना आवाहन करतो की, यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. कारण नसताना गैरसमज निर्माण होणार नाहीत,” असं अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 2:24 pm

Web Title: deputy chief minister ajit pawar reaction on proposal of night life in pune bmh 90
Next Stories
1 राज्यात गहू महागला
2 पुण्याचा वेदांग असगावकर जेईई मेन्समध्ये राज्यात पहिला
3 साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर उद्या पुण्यात विचारमंथन
Just Now!
X