‘नेतृत्व हे निवडणुकांतून नाही, तर कामातून मिळते. मंदिरे आणि स्मारके उभारण्यापेक्षा विधायक कामे केली, तरच जनता पाठीशी उभी राहाते,’ असे मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी शनिवारी व्यक्त केले.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा दिडशेव्या जयंती वर्षांच्या शुभारंभ कार्यक्रमात गांधी बोलत होते.
भूसंपादन विधेयकाबाबत अनेक गैरसमज पसरवण्यात येत आहेत. मात्र, सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन हे विधेयक मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाची आर्थिक घडी मजबूत होण्यासाठी परदेशी गुंतवणूक येणे गरजेचे आहे. सर्व घटकांचा विचार करूनच धोरणे आखण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.