News Flash

“त्या’ घटनेनंतर आता राज्यपालदेखील पहाटे…”- जयंत पाटील

पहाटेच्या शपथविधीला आज पूर्ण झालं एक वर्ष

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पहाटे शपथविधी घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला होता. त्या पहाटेच्या शपथविधीला आज वर्षपूर्ती झाली. त्यामुळे या घटनेबद्दल दिवसभरात विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आपापली मतं व्यक्त केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुण्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

एका वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या विषयी तुमची भावना काय? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, “अशा घटना राजकारणात होत असतात. त्यावर फारसं व्यक्त व्हायचं नसतं. पण मला असं वाटतं की आता घटनेनंतर राज्यपाल महोदयदेखील पहाटेच्या वेळी कोणतीही कामं करत नसतील. असो… झालं ते झालं. पण आता त्या कटु आठवणी नकोत. कारण महाआघाडीचं सरकार सुरळीत सुरू आहे!”

याच मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मत व्यक्त केलं. “आता यापुढे पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही. जे झालं ते झालं. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल, तेव्हा पहाटेची वेळ नसेल. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळेल. तसेच त्या अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचं कामही सुरू आहे. पण असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 6:31 pm

Web Title: devendra fadnavis ajit pawar oath taking one year completed ncp jayant patil takes a dig at honourable governor bhagat singh koshyari vjb 91
Next Stories
1 “मेधा कुलकर्णींना विचारा चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले?”
2 आठ-दहा दिवसानंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीबाबत निर्णय!
3 थंडीची प्रतीक्षाच..
Just Now!
X