पुणे : मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर देवेंद्र शहा हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री डेक्कन परिसरात ही घटना घडली. खंडणीसाठी हा हल्ला झाला असावा असा संशय डेक्कन पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Pune: A builder has been shot dead by three bike borne assailants on Prabhat road late last night. #Maharashtra
— ANI (@ANI) January 14, 2018
सुत्रांच्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर बिल्डर देवेंद्र शहा यांच्या घराजवळ शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शहा यांना जीवेमारण्याच्या उद्देशाने मोटरसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात शहा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 8:15 am