News Flash

आता महापालिका व जिल्हा परिषद  निवडणुकीतही भाजप पहिल्या स्थानावर

आमदार जगताप व लांडगे यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हिजन २०२०’ या अभियानाचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोसरीत झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘दहा गावं दुसरी, एक गाव भोसरी’ असे भोसरीचे कौतुक आणि आमदार लांडगे यांचा वारंवार महेश ‘दादा’ लांडगे असा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत मोठे ‘परिवर्तन’ होणार असल्याचे भाकीत भोसरीत बोलताना केले. लक्ष्मण जगताप व महेश लांडगे ही आमदार जोडी विरोधकांचा सफाया करून १०० पेक्षा जास्त जागा निवडून आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला. त्याचपद्धतीने, महापालिका व जिल्हा परिषदेतही भाजपच पहिल्या स्थानावर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार लांडगे यांनी तयार केलेल्या भोसरी मतदारसंघाच्या विकासाचा ‘व्हिजन २०२०’ या आराखडय़ाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, संजय काकडे, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते. लाखो रूपयांची उधळपट्टी करून कार्पोरेट पध्दतीने झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने लांडगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

आमदार जगताप व लांडगे यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले,‘‘शहरातील प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते नक्कीच सुटतील. पिंपरी पालिका सक्षम आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या माध्यमातून रेडझोनचा प्रश्न मार्गी लावला जाईल. रेडझोन प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. शास्तीकराचा विषय मंत्रिमंडळापुढे आणण्यात येणार असून औंध उरो रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा नक्कीच विचार करू. ‘वाय-फाय’ पिंपरी-चिंचवड, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, आळंदीला पाणीपुरवठा हे विषय मार्गी लावू,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. या वेळी बापट, जगताप यांची भाषणे झाली. प्रास्ताविक महेश लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन विजय फुगे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास भोसरी पट्टय़ात राष्ट्रवादीला खिंडार

राष्ट्रवादीचे नगरसेवक शांताराम भालेकर, नितीन काळजे, नितीन लांडगे, श्रद्धा लांडे, शुभांगी लोंढे, सुरेश म्हेत्रे, अरूणा भालेकर तसेच नगरसेवक वसंत लोंढे यांचे चिरंजीव प्रवीण, मनसेचे राहुल जाधव, शिवसेनेचे अजय सायकर, माजी उपमहापौर सुदाम लांडगे, माजी नगरसेवक संतोष लोंढे, रामदास कुंभार, अंकुश पठारे, बबन बोराटे, अशोक पारखी, अलका यादव, सुलोचना भोवरे, सारिका लांडगे, सुनंदा फुगे, झुंबरबाई शिंदे यांच्यासह योगेश लांडगे, जितेंद्र लांडगे, अंकुश लोंढे, योगेश लोंढे, मनोज साळुंके, अमृत सोनवणे, विजय फुगे, संजय नेवाळे, शैलेश मोरे, नंदू दाभाडे, शोभा पगारे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.

दिल्ली, रेडझोन आणि गाजर

महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना रेडझोनचे राजकारण खुमासदार पध्दतीने सांगितले. निवडणुका आल्या की रेडझोनचा प्रश्न काढला जातो. मतदान होताच पुन्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. २० वर्षे या पद्धतीने केवळ मतांचे राजकारण झाले. प्रश्न काही सुटला नाही. बैठकीच्या नावाखाली दिल्लीत जाणारे नेमके काय करायचे, असा प्रश्न पडायचा. रेडझोनसह बहुतेक प्रश्नांसाठी असेच गाजर दाखवले गेले. मात्र, ‘व्हिजन २०२०’ च्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावायचे आहेत, अशी ग्वाही लांडगे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 4:31 am

Web Title: devndra fadwnis belief to win pimpri chinchwad municipal corporation poll
Next Stories
1 निश्चलनीकरणामुळे रोखीचे व्यवहार करण्याची नागरिकांची मानसिकता बदलेल – पीयूष गोयल
2 नितीशकुमार यांच्याशी नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनाबाबत  मतभेद नाहीत – शरद यादव
3 पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराचे गुन्हे वाढले
Just Now!
X