28 February 2021

News Flash

धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करणार

संग्रहित

राज्याचे समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्दायवर राजीनामा द्यावा. तसेच रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत त्या प्रकरणीही कोणत्याही चौकशी यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत शरद पवार यांनी अगोदर एक विधान केले, त्यानंतर घुमजावही केले. मात्र, राज्यातील साडे अकरा कोटी जनता हे सहन करणार नाही. रेणू शर्मांची चौकशी जरूर करा पण करूणाचं काय? ती माहिती इतके दिवस का लपवली. या नैतिकतेच्या मुद्यावरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही? असा सवाल भाजपाचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करणार

धनंजय मुंडे यांनी लैंगिक अत्याचारप्रकरणी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र, अद्यापही ते राजीनामा देत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून सोमवारपासून राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पवार साहेब, उद्धवजींना देखील भेटल्यावर तिळगूळ देईल

सध्या राजकीय क्षेत्रात तिळगूळ देणे सुरू झाले आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, आपली तिळगूळ देण्याची संस्कृती आहे, त्यामुळे मी पवार साहेब, उद्धवजी यांना भेटल्यावर निश्चित तिळगूळ देईन. तसेच मेधा कुलकर्णी आणि माझे राजकीय गुरु गिरीश बापट यांनाही देईन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 5:08 pm

Web Title: dhananjay munde should resign on moral issues says chandrakant patil aau 85
Next Stories
1 “लसीबद्दल मनात शंका बाळगू नका, निःसंकोचपणे लसीकरण करून घ्या”
2 Video: अदर पुनावाला यांनी टोचून घेतली लस; दिली आरोग्य कर्मचाऱ्यांना साथ
3 विदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच
Just Now!
X