28 February 2021

News Flash

धनगर आरक्षण: पुण्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तोडफोड

तोडफोडीचे वृत्त समजताच पोलीस तिथे पोहोचले असून तोडफोडीच्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध सुरु केला आहे.

धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी दुपारी दोन तरुणांनी तोडफोड केली. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे पत्रके भिरकावत आणि भंडारा उधळून त्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.

पुण्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय असून या कार्यालयात दुपारी दोन तरुण पोहोचले. आरक्षणासंदर्भतील निवेदन द्यायचे आहे, असे सांगत दोघेही कार्यालयात गेले. यानंतर त्यांनी कार्यालयातील खुर्ची, टेबल व काचा फोडल्या. आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांनी कार्यालयात भंडारा देखील उधळला. यानंतर दोघांनी तिथून पळ काढला. तोडफोडीचे वृत्त समजताच पोलीस तिथे पोहोचले असून तोडफोडीच्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 3:16 pm

Web Title: dhangar reservation demand two person vandalized government office in pune
Next Stories
1 फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाच्या पूजेवरून वाद, विद्यार्थी संघटनांचा विरोध
2 मंकी हिलजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली, मोठा अपघात टळला
3 सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थिनींनी तयार केल्या राख्या
Just Now!
X